ritesh- genelia

अभिनेता रितेश देशमुखने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. रितेशच्या वाढदिवसानिमित्त सेलिब्रेटींपासून ते चाहत्यांपर्यंत प्रत्येकाने त्याला शुभेच्छा दिल्या. पण त्याच्या वाढदिवसानिमित्त सगळेकडे चर्चा रंगली ती जेनेलियाने तीन वर्षापूर्वी रितेशला दिलेल्या खास गिफ्टची.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

वयाच्या ४० व्या वर्षी आपल्या नवऱ्याला तो २० वर्षांचाच आहे याची जाणीव करुन देणारं जेनेलियाचं गिफ्ट आजही अनेकांच्या चर्चेचा विषय ठरतंय. २०१७ मध्ये जेनेलियाने रितेशला ४० व्या वाढदिवसानिमित्त ‘टेस्ला एक्स’ ही कार भेट दिली होती. या कारचे फोटो त्यावेळी रितेशने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. परंतु, यंदा रितेशच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा त्याच्या कारची चर्चा होऊ लागली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

हा फोटो शेअर करून रितेशने लिहीलं होतं की, ‘४० वर्षाच्या बर्थडे बॉयला २० वर्षाचा असल्याची जाणीव कशी करून द्यायची, हे माझ्या बायकोला बरोबर माहित आहे. असं कॅप्शन रितेशने या फोटोला दिलं होतं.दरम्यान, रितेश -जेनेलिया यांनी जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नगाठ बांधली. २००३ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं सांगण्यात येतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)