बरोबर सात वर्षापूर्वी दोघांनी एकत्र घेतली बॉलिवूडमध्ये एन्ट्री, आता करतायत प्रेक्षकांच्या मनावर राज्य!

 क्रितीनंही आपल्या करियरचा ग्राफ चढताच राहील याकडं लक्ष दिलं. बॅालिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत जोडी जमवत क्रितीनं आपली वेगळी छाप सोडली.

  सध्या हिंदी सिनेसृष्टीत आघाडीवर असलेल्या दोन कलाकारांनी आपल्या कारकिर्दीची यशस्वी सात वर्षे पूर्ण केली आहेत. टायगर श्रॅाफ आणि क्रिती सनोन या दोघांनीही ‘हिरोपंती’ या चित्रपटाद्वारे बॅालिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर दोघांनी आपापला मार्ग चोखाळत यशस्वी वाटचाल सुरू ठेवली. टायगरनं अभिनयासोबतच नेत्रसुखद डान्स आणि धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्सच्या बळावर आपला वेगळा चाहता वर्ग तयार केला आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

  क्रितीनंही आपल्या करियरचा ग्राफ चढताच राहील याकडं लक्ष दिलं. बॅालिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत जोडी जमवत क्रितीनं आपली वेगळी छाप सोडली. क्रितीनं साकारलेल्या बिट्टी, डिंपी, इशिता, पार्वतीबाई आणि रश्मी या व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kriti (@kritisanon)

  आगामी चित्रपटांमध्येही नवनवीन रुपांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यानं क्रिती खूप उत्सुक आहे. यात प्रभाससोबत ‘आदिपुरुष’ या महत्त्वपूर्ण चित्रपटाचा समावेश आहे. टायगरच्या नृत्यशैलीवर अबालवृद्धच नव्हे, तर ऋतिक रोशनसारखा डान्सिंग क्वीनही फिदा होतो तिथं सारं काही आलं.