टायगर श्रॅाफ आणि दक्षिणात्य सुपरस्टार महेशबाबू झळकणार एकत्र

दोघेही आपापल्या जागी खूप मोठे कलाकार आहेत. टायगर आणि महेशबाबू यांनी अगोदरच या जाहिरातीचं शूट पूर्ण केलं आहे. लवकरच ही जाहिरात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    मनोरंजन विश्वातील आघाडीतील कलाकार नेहमीच विविध जाहिरातींद्वारे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतात. छोट्या असलेल्या जाहिरातींची कमाल मात्र मोठी असते. यासाठी काही दिग्दर्शक छोट्याशा जाहिरातीसाठीही मोठ्या कलाकारांना एकत्र आणण्याची किमया करतात. अशाच एका जाहिरातीसाठी युथ आयकॅान टायगर श्रॅाफ आणि दक्षिणात्य सुपरस्टार महेशबाबू एकत्र आले आहेत.

    दोघेही आपापल्या जागी खूप मोठे कलाकार आहेत. टायगर आणि महेशबाबू यांनी अगोदरच या जाहिरातीचं शूट पूर्ण केलं आहे. लवकरच ही जाहिरात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघांचेही फॅन फॅालोईंग जबरदस्त असल्याचा फायदा या जाहिरातीला होणार आहे. महेशबाबूबद्दल बोलायचं तो दक्षिणात्य चित्रपटांमध्ये खुश आहे.

    टायगर हिंदी चित्रपटांसोबतच दक्षिणात्य चित्रपटांचा रिमेक असलेल्या चित्रपटांमध्येही काम करतोय. ‘बागी ३’ आणि ‘हिरोपंती २’मध्ये पुन्हा एकदा टायगर एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘गणपत’ या चित्रपटात त्याचा वेगळा लुक दिसेल. महेशबाबूचेही बरेच चित्रपट पाइपलाईनमध्ये आहेत.