tiger shroff

टायगरचा एक वेगळा व्हिडिओ(Tiger Shroff Magic Trick) सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे. या व्हिडिओत तो चक्क एक जादू करताना दिसत आहे.

    टायगर श्रॉफ(Tiger Shroff) सोशल मीडियावर(Social Media) कायम सक्रीय असते.आपल्या स्टंटचे  अनेक फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो.मात्र यावेळी टायगरचा एक वेगळा व्हिडिओ(Tiger Shroff Magic Trick) सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे. या व्हिडिओत तो चक्क एक जादू करताना दिसत आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Voompla (@voompla)

    टायगरचा हा व्हिडीओ व्हूम्प्ला या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत टायगरच्या हातात एक कार्ड दिसत आहे. टायगर या कार्डला हवेत उडवतो. त्या कार्डला दोरी वगैरे जोडलेली नाही ना हे तपासण्यासाठी काही लोक कार्डजवळ हात फिरवून बघतात. टायगरचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

    टायगर श्रॉफच्या या व्हिडिओतील जादू बघून लोक आश्चर्यचकीत झाले आहेत. कायम स्टंटमुळे चर्चेत असलेला टायगर यावेळी जादूमुळे चर्चेत आला आहे.