Tiger Shroff praised the creative hand of Sharik Syed behind his social media
टायगर श्रॉफच्या सोशल मीडियामागे राबत आहेत हे 'सर्जनशील हात'

मुंबई :  टायगर श्रॉफ कधीही उत्तम प्रतिभेचे कौतुक करण्याची संधी सोडत नाही आणि विशेषत: जे लोक त्याच्या कल्पनाशक्तीला साकारण्यास मदत करतात. आणि त्याच्या आयुष्यातील अशीच एक व्यक्ती म्हणजे शरीक सय्यद.
टायगर श्रॉफच्या सोशल मीडियावर त्याचे लाखो चाहते आहेत. आणि तिथे आपल्याला दिसणाऱ्या गोष्टींमागे एक सर्जनशील माणूस आहे शरीक जो, टायगरच्या कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीपासूनच त्याच्यासोबत आहे आणि प्रत्येक सर्जनशील गोष्टींसाठी टायगर त्याच्याकडे पाहतो.

तो टायगरचे सर्व व्हिडिओ शूट करतो, त्याचे फोटो शूट करतो, आणि त्यास अनोख्या पद्धतीने एडिट करतो, तुम्हाला टायगरच्या सोशल मीडियावर दिसणाऱ्या उत्तम कल्पनांमध्ये आणि त्यांचे मंथन करणारा तो साथीदार आहे. या सगळ्यासाठी टायगरला त्याच्या सोशल मीडियावर चाहत्यांकडून अतुलनीय प्रेम मिळत आहे, आणि याबद्दल बोलताना टायगर याचे सर्व श्रेय शरीक सय्यदला देतो.

टायगर म्हणतो की, “शरिक हा एक विलक्षण कौशल्य असलेली व्यक्ती आहे आणि मी खरोखर भाग्यवान आहे की तो माझ्या टीममध्ये आहे. त्याच्याकडे दिग्दर्शकाची दृष्टी आहे आणि यासोबतच त्याची व्हीएफएक्स आणि यासारख्या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानावर पकड आहे. माझ्या पहिल्या चित्रपटाच्या आधीपासूनच तो माझा सोशल मीडिया हाताळत आहे.”

जगातील सर्वात तरुण अ‍ॅक्शन सुपरस्टार, टायगर श्रॉफ, याच्या या वर्षाची सुरुवात बागी ३ पासून झाली ज्यामध्ये त्याने रॉनीच्या रूपात धमाका केला. अलीकडेच टायगरने त्याच्या ‘अनबिलीव्हेबल’ पासून गायक म्हणून पदार्पण केले असून ते बिलबोर्डमध्येही अव्वल ठरले आहे.