VIDEO टायगर श्रॉफचा मालदीवमध्ये जबरदस्त स्टंट, व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

टायगर श्रॉफ, मैत्रीण-अभिनेत्री दिशा पाटनीसमवेत मालदीवमध्ये गेला होता. त्याचबरोबर चाहते आता या दोघांसह फोटोची आतुरतेने वाट पाहत आहेत.

    बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आपल्या अभिनयाबरोबरच आपल्या डान्स आणि स्टंटमुळे ओळखला जातो. गेल्या काही काळात त्याच्या जिम आणि स्टंटचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्याचवेळी अभिनेत्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये टायगर श्रॉफ आपली पिळदार बॉडी फ्लाँट करताना दिसत आहे. नुकताच तो आणि दिशा पटानी मालदीववरून परतले आहेत.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

    या व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की, तो स्टंट करताना डाईव्ह्ज करताना दिसत आहेत. हा स्टंट पाहून चाहते या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. टायगर श्रॉफचा हा जबरदस्त स्टंट आणि डायव्हिंग करणे त्याच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. चाहत्यांसह अनेक सेलेब्रिटीजही टायगरच्या या व्हिडीओचे कौतुक करत आहेत.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

    त्याच्या या शैलीचे लोक वेडे झाले आहेत. टायगर श्रॉफ, मैत्रीण-अभिनेत्री दिशा पाटनीसमवेत मालदीवमध्ये गेला होता. त्याचबरोबर चाहते आता या दोघांसह फोटोची आतुरतेने वाट पाहत आहेत.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)