mrunal thakur

मृणालने एका चॅट शोदरम्यान आपला एक किस्सा सांगितला होता. यात तिने पॉकेटमनी मिळविण्यासाठी वडिलांचे बूट पॉलिश करायची असे सांगितले. तसेच चित्र काढणे, रंगवणे, मेहंदी काढणे या गोष्टींची तिला फार आवड होती. असे तिने सांगितले. पुढे म्हणाली की, पॉकेटमनीसाठी थोडे जास्त पैसे मिळावे म्हणून मी लग्नात नवरीच्या हातावर मेहंदी काढायला जायचे.

अनेक मराठी अभिनेते, अभिनेत्रींनी (actress)  बॉलिवूडवर ( Bollywood) आपल्या आदांनी छाप सोडली आहे. तशीच मराठमोळी अभिनेत्री (actress) मृणाल ठाकूरनेही बॉलिवूडवर आपली छाप उमटविली आहे. टेलिव्हिजन, मराठी चित्रपट (Cinema) आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने मृणालने चांगलीच कामगिरी करत छाप उमटविली आहे. गेल्या वर्षी ह्रतिक रोशनचा रिलीज झालेला चित्रपट सुपर ३० मध्ये मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे आणि कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर ती बाटला हाउसमध्येही अभिनय केला आहे.

मृणालने एका चॅट शोदरम्यान आपला एक किस्सा सांगितला होता. यात तिने पॉकेटमनी (Pocket money) मिळविण्यासाठी वडिलांचे बूट पॉलिश ( polish)करायची असे सांगितले. तसेच चित्र काढणे, रंगवणे, मेहंदी काढणे या गोष्टींची तिला फार आवड होती. असे तिने सांगितले. पुढे म्हणाली की, पॉकेटमनीसाठी थोडे जास्त पैसे मिळावे म्हणून मी लग्नात नवरीच्या हातावर मेहंदी काढायला जायचे. शिवाय वडिलांचे बूट पॉलिश करायचे. वडिलांचे बूट पॉलिश केल्यावर मला दीड रुपये मिळायचे. पण ही काम करण्यातसुद्धा एक वेगळीच मज्जा होती. असे मृणालने चॅट शोदरम्यान सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

What day is it again? . . . Ahh who cares Every day Sunday🌻 #selfpotrait #diyphotography LOL

A post shared by Mrunal Thakur (@mrunalofficial2016) on


मृणालने आमिर खानच्या ठग्स ऑफ हिंदुस्तान या सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. तर आमिर खानला मृणालला फातिमा सना शेखची भूमिका द्यायची होती परंतु काही कारणास्तव तसे होऊ शकले नाही. मृणाल आगामी वेब सीरिज ‘बाहुबली’ मध्ये दिसणार आहे. यामध्ये तिने शिवगामीची भूमिका साकारली आहे. ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लव सोनिया’ या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका केली होती. तर सलमान खानचा चित्रपट सुलतानसाठी देखील मृणालने ऑडिशन दिले होते. पंतु निर्मात्यांनी अनुष्का शर्माला या सिनेमासाठी साईन केले.

 

View this post on Instagram

 

🦋

A post shared by Mrunal Thakur (@mrunalofficial2016) on

 

View this post on Instagram

 

🎞 🎡

A post shared by Mrunal Thakur (@mrunalofficial2016) on