श्रेया घोषाल बनली आई, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज, मुलाचं नाव ठेवलं…

श्रेयाच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच अनेक सेलेब्रीटीज त्यांचे अभिनंदन करत आहेत आणि त्याचवेळी तिला स्वतःची आणि मुलाची काळजी घेण्यास सांगत आहेत.

  गायिका श्रेया घोषाल ‘आई’ बनली आहे. २२ मेला दुपारी तिने मुलाला जन्म दिला. श्रेयाने स्वत: ही गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. श्रेयाने एक पोस्ट शेअर केली आहे की, ‘दुपारी देवाने आम्हाला मुलाच्या स्वरुपात अनमोल आशीर्वाद दिला आहे. ती खूप इमोशनल गोष्ट आहे. यापूर्वी असे कधी वाटले नव्हते. शिलादित्य आणि मी हा आनंद आमच्या कुटूंबियांसमवेत साजरा करत आहोत. तुमच्या सर्व आशीर्वादांबद्दल तुमचे आभार.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by shreyaghoshal (@shreyaghoshal)

  श्रेयाच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच अनेक सेलेब्रीटीज त्यांचे अभिनंदन करत आहेत आणि त्याचवेळी तिला स्वतःची आणि मुलाची काळजी घेण्यास सांगत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by shreyaghoshal (@shreyaghoshal)

  श्रेयाने तिची गुडन्यूज शेअर केली तेव्हा तिने तिच्या बाळाचे नावही सांगितले. श्रेयाने आपला बेबी बंप फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘बेबी श्रेयादित्य ऑन द वे! शिलादित्य आणि मी तुमच्या सर्वांसोबत ही गुड न्यूज शेअर करण्यासाठी उत्साही आहोत. आम्हाला आपल्या प्रेमाची आणि आशीर्वादाची आवश्यकता आहे, कारण आम्ही आपल्या जीवनाच्या नवीन अध्यायासाठी स्वतःला तयार करत आहोत.’ श्रेयाने २०१५ मध्ये शिलादित्य मुखोपाध्यायशी लग्न केले होते.