‘तोडून टाक…’ बॅाक्सर्सचा ‘तूफानी’ आवाज, चित्रपटातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

हा व्हीडीओ बॉक्सिंग समुदाय आणि विविध अकादमी यांच्या सहकार्यानं तयार करण्यात आला होता.  

    फरहान अख्तर अभिनीत ‘तूफान’च्या धडाकेबाज ट्रेलरनं प्रेक्षकांना आकर्षित केल्यानंतर अमेझॉन प्राईम व्हीडीओनं ‘तोडून टाक…’ हे गाणं रिलीज केलं आहे. बुलंद आवाजातील हा म्युझिक व्हीडीओ प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी होत आहे. एखाद्याच्या अंतर्गत शक्ती, इच्छाशक्ती आणि विपरीत परिस्थितीतून जिद्दीचा संघर्ष याद्वारे मांडण्यात आला आहे.

    चार मिनिटांच्या या व्हिडीओत भारतीय बॉक्सिंग क्षेत्रातील अस्सल हिरो जगश्रेष्ठ सुवर्ण, रौप्य आणि ताम्र पदक विजेती लेशराम सरिता देवी, सोनिया चहल, कविता चहल, दोनदा जागतिक युवा विजेतेपद पटकावणारी नीतू घंघास आणि भारतीय आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग विजेती थुलासी हेलेन सोबत तीनदा डब्ल्यूबीसी आशिया बिरूद मिळवणारा नीरज गोयत तसेच राज्य विजेता, रजत पदक प्राप्त – अमन झांगडा, ऑल इंडिया फेडरेशन कप विजेता – गगन ‘द पिटबुल’ शर्मा, राष्ट्रीय बॉक्सिंग विजेता, सुवर्ण आणि ताम्र पदकप्राप्त – अरबिंद कुमार प्रसाद आणि बिनोद कुमार प्रसाद तसेच पूर्व क्षेत्र राष्ट्रीय बॉक्सिंग विजेता सुवर्ण आणि रजत पदकप्राप्त स्वयम मलिक आणि बिनीत गुरंग यांचा समावेश आहे.

    हा व्हीडीओ बॉक्सिंग समुदाय आणि विविध अकादमी भिवानी बॉक्सिंग क्लब (हरियाणा), सरिता रिजनल बॉक्सिंग अकॅडमी (मणिपूर), बालाजी बॉक्सिंग क्लब (कोलकाता), भोवानीपूर बॉक्सिंग असोसिएशन (कोलकाता), नजाफगरह बॉक्सिंग अकॅडमी (दिल्ली) आणि र्युको ट्रेनिंग सेंटर (लास वेगास) यांच्या सहकार्यानं तयार करण्यात आला होता.