टॉम क्रूझ अंतराळात करणार चित्रपटाचे शूटींग ?

मनोरंजन क्षेत्रामध्ये नेहमी काहीतरी नवीन प्रयोग होत असतात. अशातच टॉम क्रूझने आपल्या चित्रपटाचे शूटींग अंतराळात करण्याची घोषणा केली आहे. टॉम क्रूझ यांच्या आगामी चित्रपटाची कथा अंतराळावर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटाचे शूटींग अंतराळात व्हावे, यासाठी टॉम क्रूझचे प्रयत्न सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, टॉम क्रूझ यांच्या आगामी चित्रपटाचे शूटींग अंतराळात करता यावे, यासाठी स्पेस -एक्स आणि नासाशी बोलणी सुरु आहेत. नासाचे अॅडमिनिस्ट्रेटर जिम यांनी ट्विट करून असे म्हटले आहे की, टॉम क्रूझसोबत अंतराळात शूटींग करण्यासाठी उत्सुक आहे. 

जर खरोखर या चित्रपटाचे शूटींग अंतराळामध्ये झाले तर टॉम क्रूझ हे अंतराळात शूटींग करणारे पहिले अभिनेता ठरतील.