पुन्हा ‘फुकरे’चा मॅडनेस ‘चुट्ज़पाह’ या वेब शोचा ट्रेलर लाँच!

या शोमध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पहायला मिळणार आहेत. या वेब शोमध्ये ओटीटी स्पेसमधील स्टोरीचाही समावेश करण्यात आला आहे.

    सोनी लिव आणि मॅडॉक आउटसाइडर यांनी नुकतंच ‘चुट्ज़पाह’ या वेब शोचा ट्रेलर लाँच केला आहे. आपल्या अनोख्या टाइटलवर खरे उतरत, नव्या जमान्याच्या या नव्या वेब शोचा ट्रेलर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या प्रासंगिकता दर्शवतो. याच कारणामुळं या शोच्या ट्रेलरनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे या शोच्या निमित्तानं ‘फुकरे’ची टीम पुन्हा एकदा धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे.

    आजच्या पिढीतील लोकप्रिय अभिनेता वरुण शर्मा, मनजोत सिंह, गौतम मेहरा, तान्या मानिकतला, एलनाज़ नोरोज़ी आणि क्षितिज चौहान यांच्यासोबत, ‘चुट्ज़पाह’ आजच्या युगातील माणसाच्या ओळखीच्या डिजिटल परिवर्तनाची झलक सादर करतो. या शोमध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पहायला मिळणार आहेत. या वेब शोमध्ये ओटीटी स्पेसमधील स्टोरीचाही समावेश करण्यात आला आहे. दिनेश विजान द्वारा निर्मित या वेब शोचं लेखन अमित बब्बर आणि मृगदीप सिंह लांबा यांनी केलं आहे. २३ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या वेब शोचं दिग्दर्शन सिमरप्रीत सिंह यांनी केलं आहे.