अभिनेत्री जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

  • गुंजन सक्सेना यांनी १९९९ मध्ये कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच लढाऊ विमान उडवणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या होत्या. या ट्रेलरमध्ये गुंजन आपल्या वडिलांच्या मदतीने पायलट बनण्याचे स्वप्न पूर्ण करते. त्यानंतर ट्रेनिगं आणि पायलट म्हणून हवाई दलात एकमेव महिला असल्याने कशाप्रकारे आव्हानांचा सामना करते. या सर्व महत्त्वाच्या गोष्टी पाहायला मिळत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं नाव ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ असं आहे. नुकताच बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. तसेच या ट्रेलरला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गुंजन सक्सेना हा चित्रपट भारतीय हवाई दलातील पायलट गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित आहे.

गुंजन सक्सेना यांनी १९९९  मध्ये कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच लढाऊ विमान उडवणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या होत्या. या ट्रेलरमध्ये गुंजन आपल्या वडिलांच्या मदतीने पायलट बनण्याचे स्वप्न पूर्ण करते. त्यानंतर ट्रेनिगं आणि पायलट म्हणून हवाई दलात एकमेव महिला असल्याने कशाप्रकारे आव्हानांचा सामना करते. या सर्व महत्त्वाच्या गोष्टी पाहायला मिळत आहेत.  

या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले आहे. तसेच या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूरसह,पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनीत कुमार सिंह, मानव विज आणि आयशा रझा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच हा चित्रपट २४ एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. त्यामुळे हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १२  ऑगस्टला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.