priyanka , rajkumar and white tiger

प्रियांका चोप्रा(priyanka chopra) नेहमीच तिच्या कामामुळे चर्चेत असते. लवकरच प्रियांका ‘द व्हाइट टायगर’(the white tiger movie trailer) या  चित्रपटात झळकणार आहे. त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा प्रियांकाची चर्चा सुरू झाली आहे.

या चित्रपटात प्रियांका आणि राजकुमार मुख्य भूमिकेत आहेत. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून प्रियांका-राजकुमार दिल्लीस्थित एका श्रीमंत जोडप्याची भूमिका साकारत असल्याचे दिसून येत आहे. तर अभिनेता आदर्श गौरव त्यांच्या कारचालकाची म्हणजेच बलरामची भूमिका साकारत आहे.

श्रीमंत होण्याची स्वप्न पाहणारा बलराम त्याला शक्य होईल तितके प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. मात्र, एका वळणावर श्रीमंत होण्याच्या ध्येयाने पछाडलेला बलराम चुकीच्या मार्गाला लागतो आणि या चित्रपटाची संपूर्ण कथा पालटते. या कथेत नेमके काय होते हे चित्रपट पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना समजणार आहे.

‘द व्हाइट टायगर’ हा चित्रपट अरविंद अडिगा यांच्या ‘द व्हाइट टाइगर’ या पुस्तकावर आधारित आहे. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमिन बहरानी करणार आहेत तर मुकुल देवडा या चित्रपटाची निर्मिती करत आहे.