जान्हवीच्या मंगळसूत्रानंतर आता महिलावर्गाचं लक्ष वेधून घेईल ऐश्वर्याचं लक्ष्मी मंगळसूत्राने!

ऐश्वर्याचं अनोखं मंगळसूत्र. ऐश्वर्या लक्ष्मीच्या पावलांनी जाधव घरात येणार आहे, म्हणूनच की काय ऐश्वर्यासाठी खास लक्ष्मीचं मंगळसूत्र बनवलं गेलं आहे.

  तू सौभाग्यवती हो या मालिकेत सध्या लगीन घाई बघायला मिळत आहे. ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा आगळा वेगळा विवाह सोहळा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा विवाह सोहळा फक्त आगळा वेगळा नसून भव्यदिव्य पण आहे. जाधव घराण्याला शोभून दिसेल अशा थाटात हे लग्न होणार आहे.

   

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

  आणि या लग्नात सर्वांचं लक्ष वेधून घेतंय ते म्हणजे ऐश्वर्याचं अनोखं मंगळसूत्र. ऐश्वर्या लक्ष्मीच्या पावलांनी जाधव घरात येणार आहे, म्हणूनच की काय ऐश्वर्यासाठी खास लक्ष्मीचं मंगळसूत्र बनवलं गेलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

  ऐश्वर्या आणि सूर्यभान यांची लगीन घाई सुरु झाली आहे आणि लग्न म्हटलं की हळद आलीच. हे लग्न अनोखं आहे म्हणजे हळद ही अनोखी असणारच. ऐश्वर्या आणि सूर्यभान यांची हळद होत असून यात नवराई सजलेली दिसत आहे आणि नाचगाण्याने आणि आनंदाने हा हळदीचा सोहळा पार पडत आहे.