मालिका वेगळी पण ठिकाण एकच, केतकर भावा- बहिणीच्या मालिकांचं गोव्यात शुटींग सुरू!

राज्यातील चित्रीकरणावर बंदी आल्यामुळे मालिकांचं चित्रीकरण थांबलं, पण 'तू सौभाग्यवती हो' या मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांना आत्तापर्यंत पाहायला मिळाले आणि सिनेसृष्टीत 'शो मस्ट गो ऑन' असे म्हटले जाते, त्याप्रमाणे हे मनोरंजन असेच अखंडित सुरू राहणार आहे.

  देशावर कोरोनाचे संकट असताना सुरक्षिततेसाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे राज्यातील चित्रीकरणदेखील बंद करण्यात आले. एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस आलेली सोनी मराठी वाहिनीवरील नवी मालिका ‘तू सौभाग्यवती हो’ थोड्याच काळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. साधी, गावातली ऐश्वर्या आणि त्याच गावतले प्रस्थ असलेला सूर्यभान यांची ही गोष्ट आहे. ऐश्वर्या जाधवांची सून कशी होणार आहे आणि त्यापुढे कायकाय घडणार आहे, हे सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

   

  राज्यातील चित्रीकरणावर बंदी आल्यामुळे मालिकांचं चित्रीकरण थांबलं, पण ‘तू सौभाग्यवती हो’ या मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांना आत्तापर्यंत पाहायला मिळाले आणि सिनेसृष्टीत ‘शो मस्ट गो ऑन’ असे म्हटले जाते, त्याप्रमाणे हे मनोरंजन असेच अखंडित सुरू राहणार आहे. मनवा नाईकच्या स्ट्रॉबेरी प्रोडक्शन या संस्थेची निर्मिती असलेली मालिका ‘तू सौभाग्यवती हो’चा चमू आता गोव्याला पोचला असून मालिकेच्या पुढील भागांचे चित्रीकरण गोव्यात होईल. पाहत राहा, ‘तू सौभाग्यवती हो’, सोम.-शनि., संध्या. ७ वा. फक्त आपल्या सोनी मराठीवर.