NAADKHULA serial

दोन विरुद्ध स्वभावाचे स्वाती आणि रघू एकमेकांच्या प्रेमात पडणार का? याची गोष्ट म्हणजे तुझ्या इश्काचा नादखुळा ही नवी मालिका. स्टार प्रवाहवर २१ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या नव्या मालिकेतून एक हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

स्टार प्रवाहवर २१ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या नव्या मालिकेतून एक हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साधा-सरळ, मनमिळाऊ, नम्र, सगळ्यांशी प्रेमाने वागणारा नवरा हवा अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. स्वातीदेखील याला अपवाद नाही. साधाभोळा आणि नऊ ते पाच अशी नोकरी करणाऱ्या मुलाशीच मी लग्न करणार या मतावर स्वाती ठाम असते. तर स्वातीवर जीवापाड प्रेम करणारा रघू मात्र याच्या परस्पर विरोधी स्वभावाचा. रघू फक्त एकदाच सांगतो नाहीतर सरळ उलटा टांगतो हे ब्रीदवाक्य घेऊन मनमौजी जगणारा. असे हे दोन विरुद्ध स्वभावाचे स्वाती आणि रघू एकमेकांच्या प्रेमात पडणार का? याची गोष्ट म्हणजे तुझ्या इश्काचा नादखुळा ही नवी मालिका.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘रांगड्या प्रेमाची हळवी गोष्ट म्हणजे तुझ्या इश्काचा नादखुळा ही मालिका. दिलखुलास आणि बिनधास्त. असा हिरो आणि असं जग बऱ्याच दिवसांनी रसिकांच्या भेटीस येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनी सतत वेगळ्या धाटणीच्या गोष्टी सादर करत आहे. तुझ्या इश्काचा नादखुळा अशीच एक फ्रेश लव्हस्टोरी आहे. वेगवान कथानक आणि ट्विस्ट्स अँड टर्न्सच्या माध्यमातून रसिकांसमोर हुरहूर लावणाऱ्या तडकेबाज लव्हस्टोरीचा आनंद प्रेक्षकांना घेता येईल.’

अभिनेता संचित चौधरी आणि अक्षया हिंदळकर ही नवी जोडी या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती महेश तागडे यांच्या टेल अ टेल निर्मिती संस्थेअंतर्गत करण्यात आली आहे. तेव्हा पाहायला विसरु नवी मालिका ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ २१ डिसेंबरपासून रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.