मन शांत आणि स्थिर राखण्यासाठी ध्यानधारणेची मोलाची मदत झाली -मनीष वर्मा

कोरोनाच्या फैलावामुळे सर्वत्र निराशादायक वातावरण निर्माण झालं असून, त्याचा लोकांच्या मनावर परिणाम होत असल्याचं मनीषला वाटतं.

    झी टीव्हीवरील ‘तेरी मेरी इक जिंदरी’ ही मालिका पहिल्या भागापासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. परस्परविरोधी स्वभावाच्या दोन तरूण जीवांच्या प्रेमकथेनं प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. या कथेत मनीष वर्मा साकारत असलेल्या गुलशननं थरारक नाट्य निर्माण करून माही-जोगीच्या जीवनात उलथापालथ घडवली होती. हाच मनीष सध्या सोशल माध्यमांद्वारे सकारात्मकता पसरविण्याचं कामही यथाशक्ती करत आहे. कोरोनाच्या फैलावामुळे सर्वत्र निराशादायक वातावरण निर्माण झालं असून, त्याचा लोकांच्या मनावर परिणाम होत असल्याचं मनीषला वाटतं.

     मनावरील निराशेचं सावट दूर करण्यासाठी लोकांनी पुस्तकं वाचावीत किंवा ध्यानधारणा करावी, असं मनीषचं मत आहे. मनानं सकारात्मक, आशावादी राहणं हा त्यावरील एकमेव उपाय आहे. सध्याच्या परिस्थितीत गरजूंना मदत उपलब्ध करून देण्यासाठी मी खूप प्रयत्न करीत असलो, तरी या निराशादायक वातावरणाचा माझ्यावरही थोडाफार परिणाम झालाच होता. अशा वेळी मला माझं मन शांत आणि स्थिर राखण्यासाठी ध्यानधारणेची मोलाची मदत झाली. ध्यानधारणा हा सर्वोत्तम उपाय आहे, यावर विश्वास ठेवा. मी जेव्हा एखादी वाईट आणि मन अस्वस्थ करणारी बातमी ऐकतो, तेव्हा माझं मन शांत राखण्यासाठी मी ध्यानधारणा करतो.