धक्कादायक! अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन, वयाच्या ४० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

धक्कादायक बातमी, सिद्धार्थ शुक्लाने कूपर हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे.

    अभिनेता आणि बिग बॉसचा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या ४० व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं आहे.

    अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधं घेतली होती. पण त्यानंतर तो उठू शकला नाही. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर सिद्धार्थचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सिद्धार्थ हा टीव्ही क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता आहे. १२ डिसेंबर १९८० साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.

    सिद्धार्थ हा बिग बॉस १३चा विनर आहे. आजपर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये त्याने कामं केली आहेत. सिद्धार्थने बालिका वधू या मालिकेतून अनेकांची मनं जिंकली होती. या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्याने खतरों के खिलाडी या शोच्या सातव्या सिझनमध्येही सहभाग घेतला होता.