sidharth shukla

‘बिग बॉस १३’चा विजेता ठरला सिद्धार्थ कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात तो नशेच्या भरात एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे.  नुकताच सिद्धार्थने त्याचा ४० वा वाढदिवस साजरा केला.

वाढदिवसादिवशीचा सिद्धार्थचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ‘द खबरी’ या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सिध्दार्थने नशेच्या भरात एका डिलिव्हरी बॉयला मारहाण केली आहे. अंधेरीतील ओशिवारा या भागात ही घटना घडली असून त्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

आपल्या वाढदिवसाची पार्टी संपल्यावर सिद्धार्थ घरी जाण्यासाठी निघाला. मात्र, त्याच वेळी ओशिवारा या भागात त्याच्या कारला एका डिलिव्हरी बॉयच्या बाईकची धडक बसली. त्यानंतर डिलीव्हरी बॉय व सिद्धार्थ शुक्ला यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादानंतर सिद्धार्थने थेट या मुलावर हात उचलत त्याला मारहाण केली. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.