कंगना आणि रेणुका शहाणेंमध्ये ट्विटर वॉर, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

अभिनेत्री रेणुका शहाणेनी कंगनाला ट्विटरच्या माध्यमातून मराठीतून खडेबोल सुनावले आहे. 'उचलली जीभ आणि लावली टाळ्याला' असे रेणुकाजी म्हणाल्या आहेत.

मुंबई : कंगना रनौतने गुरुवारी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे राज्यात मोठा गदारोळ माजला आहे. राजकीय नेत्यांपासून ते दिग्गज कलाकारांनी कंगनावर ताशेरे ओढले आहेत. कंगना यामुळे टीकेची धनी झाली आहे. (Twitter war between Kangana and Renuka Shahane,) सर्वच स्तरांतून तीच्यावर चीड व्यक्त होत आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी कंगनाविषयी संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री रेणुका शहाणेनी कंगनाला ट्विटरच्या माध्यमातून मराठीतून खडेबोल सुनावले आहे. (Twitter war between Kangana and Renuka Shahane,) ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ असे रेणुकाजी म्हणाल्या आहेत.

रेणुका शहाणे यांनी कंगना रनौतला ट्विट करत म्हटले आहे की, प्रिय कंगना, मुंबई असे शहर आहे, जिथे तुजे अभिनेत्री होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्यामुळे या अद्भूत शहराबद्दल आदरभाव ठेवण्याची तुझ्याकडून आपेक्षा होती. परंतु तू पाकव्याप्त काश्मीरसोबत केलेली मुंबईची तुलना धक्कादायक आहे. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, अशा आशयाचे ट्विट रेणुका शहाणे यांनी केले आहे. तसेच त्यापुढे संताप दर्शविणारा इमोजीही दाखविला आहे.


काही वेळातच रेणुका शहाणेंच्या ट्विटची कंगनाने दखल घेतली आहे. तिनेही त्यांच्या ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगना रनौतने ट्विट करत म्हटले आहे की, प्रिय रेणुकाजी, सरकारच्या कमकुवत कारभारावर केलेली टीका त्या शहरावरील टीका कधीपासून मानली जाऊ लागली? मला वाटत नाही की तुम्ही एवढ्या भोळ्याभाबड्या आहात. आपणसुद्धा रक्तासाठी तहानलेल्या गिधाडाप्रमाणे माझ्या मांसाचा लचका घेण्याची वाट बघत होता ? तुमच्याकडून चांगल्या आपेक्षा ठेवल्या होत्या. अशा आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे.


दरम्यान काही कालावधीनंतर कंगनाच्या ट्विटला रेणुका शहाणेंनी पुन्हा आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले आहे की, प्रिय कंगना, मी सरकारवर टीका करण्यास हरकत घेत नाही. परंतु मुंबई पीओकेसारखी का वाटत आहे, ही मला मुंबई आणि पाकव्याप्त काश्मीर यांच्यात थेट तुलना असल्यासारखं वाटत आहे. हीत तुलना खरोखर खूप वाईट होती. आणि मुंबईकर म्हणून मला ते आवडले नाही. तसेच कदाचित तुझ्याकडून आणखी चांगल्याची अपेक्षा करणे, हाच माझा भोळेपणा होता. असा टोला रेणुका शहाणे यांना कंगनाला त्यांच्या ट्विटमधून लगावला आहे.


आता रेणुका शहाणेंनी दिलेल्या उत्तराला कंगना काय उत्तर देते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण : सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा