‘फॅमिली मॅन 2’ मध्ये चेल्लमच्या भूमिकेची सोशल मीडियावर चर्चा, अभिनेत्यावर मीम्सचा पाऊस!

या वेबसिरिजमध्ये चेल्लमची भूमिका उदय महेश यांनी साकारली आहे. ते तामीळ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आहेत.

  सध्या फॅमिली मॅन २ या वेबसिरीजची सगळीकडे चर्चा रंगली आहे. मनोज वाजपेयीची मुख्य भूमिका असलेल्या या वेबसिरीजमध्ये सगळ्यांच कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. या वेबसिरिजमधील एक कलाकार सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. यावर विविध मीम्स देखील बनवले जात आहेत. हा कलाकार म्हणजे चेल्लम.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Movies For You (@movies4u_official)

  फॅमिली मॅन 2 मध्ये श्रीकांतला कोणत्याही गोष्टीविषयी माहिती हवी असल्यास तो चेल्लमला विचारतो आणि चेल्लमला सगळ्याच गोष्टी माहीत असल्याने तो लगेचच त्या गोष्टींविषयी सांगतो. याच चेल्लमवरून सोशल मीडियावर मीम्स देखील बनत आहे.

  कोण आहेत चेल्लम

  या वेबसिरिजमध्ये चेल्लमची भूमिका उदय महेश यांनी साकारली आहे. ते तामीळ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी दीपन या व्यक्तिरेखेसाठी सुरुवातीला ऑडिशन दिले होते. पण चेल्लम या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली. अभिनयापेक्षा उदय महेश यांना दिग्दर्शन आणि लेखनात अधिक रस आहे. त्यांनी कबाली, मद्रास कॅफे यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.