प्रेमाचे नवे रंग दाखवणारा ‘लव्ह सॅारीज’!

आज प्रत्येक मोठा निर्माता-दिग्दर्शक प्रेमकथांच्या प्रेमात असल्याचं पहायला मिळतो, पण या सर्वांपेक्षा 'लव्ह सॅारीज' प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणारा आहे. त्यामुळंच पाहणारी प्रत्येक व्यक्ती स्वत:ला 'लव्ह सॅरीज'सोबत रिलेट करेल.

    आजवर आपण बऱ्याच लव्ह स्टोरीज ऐकल्या किंवा पाहिल्या असतील, पण आता ‘लव्ह सॅारीज’ पहायला मिळणार आहेत. ‘लव्ह तो ओव्हररेटेड है’ या टॅगलाईनसह ‘लव्ह सॅारीज’ हा चित्रपट एमएक्स प्लेअरसह बॅालिवूड हंगामा, एअरटेल एक्स्ट्रीम, व्हीआयवर प्रदर्शित झाला आहे. प्रेमाची अनोखी व्याख्या मांडणाऱ्या या चित्रपटात प्रेमात कसे इमोशन्स एकमेकांवर भारी पडतात हे दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट चार गोष्टींची अँन्थोलॅाजी आहे.

    आज प्रत्येक मोठा निर्माता-दिग्दर्शक प्रेमकथांच्या प्रेमात असल्याचं पहायला मिळतो, पण या सर्वांपेक्षा ‘लव्ह सॅारीज’ प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणारा आहे. त्यामुळंच पाहणारी प्रत्येक व्यक्ती स्वत:ला ‘लव्ह सॅरीज’सोबत रिलेट करेल. मध्य प्रदेशमधील काही नयनरम्य लोकेशन्सवर शूट करण्यात आलेला हा चित्रपट पाश्चिमात्य नव्हेतर भारतीय प्रेमाचे रंग उधळणारा आहे. प्रेमीयुगूलांना आरसा दाखवत त्यांना उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देणारा आहे. प्रेम सर्वात श्रेष्ठ आहे का? प्रेमात कोणी वाया जातं का? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या चित्रपटाच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सुख-दु:ख येतं आणि जातं, पण प्रेमातील इमोशन्स कायम राहतात.

    ‘अजहर’, ‘जिद’ आणि ‘शादी में जरूर आना’ या चित्रपटांसोबतच काही जाहिरातींमध्ये झळकलेला करणवीर शर्मा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. करणच्या जोडीला दक्षिणात्य सिनेसृष्टीत नावारूपाला आलेली अर्चना गुप्ता आहे. अर्चनानं ‘रोमान्स की कहानी’, ‘पवित्र बंधन’, ‘नागिन’ या शोमध्ये काम केलं आहे. याशिवाय प्रीतिका राव, पुनित चौकसे, स्टॅफी पटेल, प्रियांशू सिंह, आकाश माखीजा आणि देविशी मदान आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत. गौतम जोशींनी याचं दिग्दर्शन केलं आहे.