सलमान खान आपल्या आधी २ फूट अजीम मन्सुरी यांच्यासाठी शोधणार वधू, दिली ‘ही’ खास ऑफर!

अझीम त्यांच्या सहा भावंडांपैकी सर्वात धाकटे आहेत. त्याच्या उंचीमुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. कारण, लोक त्यांच्या उंचीची नेहमीच चेष्टा करतात. शाळेतही त्यांना इतका त्रास झाला की, त्यांनी शिक्षण सोडले आणि व्यवसायात प्रवेश केला.

  अवघ्या २ फूट ३ इंचीचे अजीम मन्सुरी हे यूपीमधील शामलीमध्ये राहतात. गेले काही दिवस सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा रंगली आहे. कारण ते गग्न होत नसल्यामुळे नाराज आहेत.  त्यांची लग्नाची मागणी आता थेट बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, तसेच जगभरातील मुलींपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे त्यांच्याशी लग्न करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. पोलिसांकडे जाऊन लग्न लावून देण्याची मागणी करणारे अजीम मन्सुरींचे नशीब रातोरात स्टार झाले. खुद्द भाईजानने मुंबईला येण्यासाठी आमंत्रण पाठवलय. अजीम मन्सुरी खूप खूश आहे.

  काय आहे प्रकरण

  अजीम मन्सुरीने यांनी पोलिसांसमोर लग्न लावून द्या, अशी मागणी केली होती. लग्न होत नसल्याने चिंतेत असणाऱ्या अझीम यांनी एसडीएम ते मुख्यमंत्र्यांकडे लग्न लावून देण्यासाठी विनंती केली होती. अत्यंत कमी उंचीमुळे त्यांचे लग्न जमत नव्हते.

  लग्नासाठी वधूंची रांग!

  अजीमचे कुटुंबीय सांगतात की, जेव्हापासून त्यांच्याबद्दल बातम्या माध्यमात आल्या आहेत तेव्हापासूनच त्यांच्या विवाहसाठी स्थळे येण्यास सुरुवात झाली आहे. बर्‍याच मुलींकडून, त्यांच्या कुटुंबियांकडून कॉल येत आहेत.

  अझीम त्यांच्या सहा भावंडांपैकी सर्वात धाकटे आहेत. त्याच्या उंचीमुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. कारण, लोक त्यांच्या उंचीची नेहमीच चेष्टा करतात. शाळेतही त्यांना इतका त्रास झाला की, त्यांनी शिक्षण सोडले आणि व्यवसायात प्रवेश केला. त्यानंतरच त्यांनी एक कॉस्मेटिक शॉप सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या भावासोबत तिथे काम करण्यास सुरुवात केली.

  उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले २६  वर्षीय अजीम मन्सुरी यांना लवकरात लवकर लग्न करायचे आहे. या तणावामुळे त्यांना रात्रभर झोप येत नाही. घरातील लोक प्रयत्न करत नाहीत, म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे, त्यांनी केवळ अर्ज केला नाही तर, ‘इतक्या’ वेळात त्यांचे लग्न करावे, अशी मागणी देखील केली आहे. वर्तमानपत्रे, टीव्ही न्यूज चॅनेल्समध्येही अजिनच्या लग्नाची बातमीची चर्चा सुरू आहे.