urmila

आर्थिक सुधारणांना गती देण्यासाठी सरकारने गुंतवणुकीत वाढ केली असून, याशिवाय भांडवली निधीतही ३४ टक्के वाढ केलीय. सरकारला खर्च करण्यासाठी पैशांची गरज आहे आणि म्हणूनच ते कर वसूल करतात. केंद्र आणि राज्य दोन्ही पेट्रोल डिझेलवर कर आकारतात.

    दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या इंधन दरवाढीविरोधात सर्वसामान्य वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही मोदी सरकारविरोधात आवाज उठवला आहे. त्यातच शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ट्विटरवरुन मोदी सरकारवर टीका केलीये.

    ‘तू गरीब होने का नाटक मत कर ऐ दोस्त.. मैंने तुझे देखा है पेट्रोल भराते हुऐ!!’ असं ट्विट करत उर्मिला मातोंडकर यांनी मोदी सरकारला टोमणा मारला आहे.

     

    गेल्या १२ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ऐन महागाईत गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भावही वाढत आहेत. रविवारी इंधनदरांमध्ये थोडे फार स्थैर्य पाहायला मिळाल्यानंतर आज पुन्हा दरांमध्ये ३० पैशांनी वाढ झाली.

    म्हणून भाव वाढले

    आर्थिक सुधारणांना गती देण्यासाठी सरकारने गुंतवणुकीत वाढ केली असून, याशिवाय भांडवली निधीतही ३४ टक्के वाढ केलीय. सरकारला खर्च करण्यासाठी पैशांची गरज आहे आणि म्हणूनच ते कर वसूल करतात. केंद्र आणि राज्य दोन्ही पेट्रोल डिझेलवर कर आकारतात. राज्य सरकारही यावेळी खर्च वाढवत आहे, त्यामुळे त्यालाही अधिक कराची गरज आहे. अर्थमंत्री या समस्येवर तोडगा काढतील, अशी आशा पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली.