urvashi rautela says bollywood outsiders treated like things for trp
बॉलिवूडमध्ये बाहेरच्या कलाकारांना वस्तुप्रमाणे वापरलं जातं, 'या' अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

हे दोन्ही चित्रपट हिंदी भाषेमध्येही प्रदर्शित होणार आहेत. यापैकी एका चित्रपटाचं शीर्षक 'ब्लॅक रोझ' असून, दुसऱ्याचं टायटल अद्याप निश्चित झालेलं नाही.

    हिंदीसोबतच कन्नड आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या बोल्ड अभिनयामुळं अल्पावधीत चर्चेत आली आहे. २०१५मध्ये मिस दिवा युनिव्हर्स बनलेल्या उर्वशीनं ‘पागलपंती’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘हेट स्टोरी ४’, ‘काबील’, ‘सनम रे’ या हिंदी चित्रपटांसोबत इतर भाषांमधील सिनेमांमध्येही अभिनय केला आहे.

    उर्वशीला आता कॅालिवूड म्हणजेच तमिळ सिनेसृष्टीत पदार्पणाचे वेध लागले आहेत. उर्वशीच्या पर्समध्ये सध्या दोन तेलुगू चित्रपटांच्या आॅफर्स आहेत. हे दोन्ही चित्रपट हिंदी भाषेमध्येही प्रदर्शित होणार आहेत. यापैकी एका चित्रपटाचं शीर्षक ‘ब्लॅक रोझ’ असून, दुसऱ्याचं टायटल अद्याप निश्चित झालेलं नाही.

    या निमित्तानं उर्वशीला साय-फाय चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. तेलुगूमधील अभिनेता सरवाननसोबत तिची जोडी जमली आहे. या चित्रपटात उर्वशी मायक्रोबायोलॅाजिस्टची भूमिका साकारताना दिसणार आहे. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘वर्जिन भानुप्रीया’ या हिंदी चित्रपटानंतर उर्वशीनं कॅालिवुडची वाट धरली आहे.