बिग बजेट चित्रपटातून आलिया भट आऊट, तर ‘ही’ अभिनेत्री झाली इन!

उर्वशीने यापूर्वी “काबिल”, “सनम रे”, “भाग जॉनी” यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच उर्वशीने “लव डोस”, “बिजली की तार” आणि “तेरी लोड वे” सारख्या काही म्युजिक अल्बममध्ये काम केले आहे.

    अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या चित्रपटांसोबतच ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते. आता उर्वशी तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत असल्याचे समोर आले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार होती. पण आता उर्वशीची निवड करण्यात आल्याचे समोर आले आहे.

    यापूर्वी रजनीकांत, विक्रम, विजय, अजित कुमार या दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्सबरोबर काम केलेले जोसेफ डी सामी आणि जेराल्ड आरोकीयम हे तमिळ  साय-फाय चित्रपटात उर्वशी रौतेला सोबत काम करणार आहेत. उर्वशी रौतेला मायक्रोबायोलॉजिस्ट आणि आयआयटीयनची भूमिका साकारणार असून मनालीमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला त्यांनी सुरुवातही केली आहे.

    हा सुमारे २०० कोटींचा बिग बजेट चित्रपट आहे. चित्रपट तमिळ, कानडा, तेलगू, हिंदी आणि मल्याळममध्ये रिलीज होणार आहे.

    उर्वशीने यापूर्वी “काबिल”, “सनम रे”, “भाग जॉनी” यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच उर्वशीने “लव डोस”, “बिजली की तार” आणि “तेरी लोड वे” सारख्या काही म्युजिक अल्बममध्ये काम केले आहे. लवकरच उर्वशी रौतेला ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ती सध्या या सीरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या सीरिजमध्ये उर्वशी अभिनेता रणदीप हूड्डासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. “इंस्पेक्टर अविनाश” ही सीरिज नीरज पाठक दिग्दर्शित करीत आहे. या सीरिजमध्ये पोलीस अधिकारी अविनाश मिश्राची कथा दाखवण्यात येणार आहे.