kangana ranavat

कंगनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण अभिनेत्री कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे.(court order to file fir against kangana ranawat)वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना हा आदेश दिला आहे.

कंगनाच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. कारण अभिनेत्री कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे.(court order to file fir against kangana ranawat)वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना हा आदेश दिला आहे. कंगनासोबतच रंगोली या कंगनाच्या बहिणीविरोधातही एफआयआर दाखल करण्याचा आदेश असल्याचे समजते.  ट्विट आणि मुलाखतींच्या माध्यमातून कंगना आणि रंगोली धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी वांद्रे कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. याचिकेत कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करतेय. हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढ निर्माण करतेय. आक्षेपार्ह ट्विट करुन कंगना धार्मिक भावना दुखावत आहे,असे आरोप करण्यात आले आहेत. याचिकाकर्त्यांनी पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडीओ सादर केले आहेत. त्यानुसार कंगनावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

याचिकाकर्त्यांनी आधी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील पोलिसांनी तक्रार  दाखल करण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली.  कोर्टाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला.