‘वर्तमान’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, अभिनेता सुबोध भावे दिसणार मुख्य भुमिकेत!

हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हेमंत पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पाटील म्हणाले की सध्याच्या परिस्थिती मध्ये आमदार खासदार आणि नेतेमंडळी यांचा जनतेशी व सर्वसामान्य नागरिकांशी वागण्याचा व पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो.

    ‘वर्तमान’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले असून पोस्टरवरती प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे दिसत आहे. सुबोधच्या पाठमागे वर्तमान पत्रातील बातम्या दिसत असून बाजूला पेन दिसत आहे. या पोस्टर वरून लक्षात येते की पत्रकार व पत्रकारिता यावर थेट भाष्य करणारा हा चित्रपट आहे.

    हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हेमंत पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पाटील म्हणाले की सध्याच्या परिस्थिती मध्ये आमदार खासदार आणि नेतेमंडळी यांचा जनतेशी व सर्वसामान्य नागरिकांशी वागण्याचा व पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो.

    या चित्रपटात सुबोध भावे, मंगेश देसाई, राहुल सोलापूरकर, कुलदीप पवार, अवतार गिल तेजस्विनी पंडित, संजय मोहिते, असे अनेक कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण नंदकुमार पाटील, संकलन संतोष जीवनजीकर, कला दत्ता लोंढे, नृत्य फुलवा खामकर, वेशभूषा सपना बन्सल तर चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत दुधगावकर, गीतकार, इलाही जमादार, संगीत हर्षित अभिराज तर चित्रपट लेखन संजय पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्माते हेमंत पाटील  म्हणाले की मराठीतील मल्टीस्टारर व दर्जात्मक कथानक असलेला चित्रपट रसिकांच्या मनाचा ठाव घेईल