jug jug jio team

चंदिगढमध्ये सुरू असलेल्या जुग जुग जिओ सिनेमाच्या टीममधील काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे. या सिनेमातील प्रमुख कलाकार, वरूण धवन, कियारा अडवाणी आणि नीतू कपूर यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. गुरूवारी संध्याकाळी या तिन्ही कलाकारांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट आला.

View this post on Instagram

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

या कलाकारांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे सिनेमांच शुटींग थांबवण्यात आलं आहे. आज संध्याकाळपर्यंत सिनेमाच्या टीमकडून अधिकृत निवेदन येण्याची शक्यता आहे. अलिकडेच अभिनेते सनी देओल हिमाचल प्रदेशात सुट्टीवर गेले असता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. त्यांना तिथेच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

View this post on Instagram

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

ऋषी कपूर यांचे निधन होऊन ६ महिने झाले. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच नितू सिंग कामासाठी बाहेर पडल्या आहेत. सिनेमाच्या शुटींगला जाताना नितू यांना ऋषी कपूर यांची आठवण झाली. राज मेहता दिग्दर्शित जुग जुग जिओ एक विनोदी रोमॅण्टीक चित्रपट आहे. या चित्रपटात अनिल कपूर, नितू सिंग पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.