अरूणाचल प्रदेशमध्ये अभिनेता वरूण धवनची चिमुकल्यासोबत मस्ती, Video सोशल मीडियावर व्हायरल!

सध्या वरूणने तिथल्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. या व्हिडीओत वरुण एका गोंडस बाळासोबत खेळताना दिसतोय.

  अभिनेता वरूण धवन काही दिवसांपूर्वीच लग्न बंधनात अडकला. नताशा दलाल हिच्यासोबत वरूणने लग्नगाठ बांधली. वरुण सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये त्याच्या आगामी सिनेमाचं शूटींग करतोय. ‘भेडिया’ या हॉरर कॉमेडी सिनेमाच्या शूटिंगसाठी वरुण अरुणाचल प्रदेशमध्ये गेला आहे. तिथले फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by VarunDhawan (@varundvn)

  सध्या वरूणने तिथल्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. या व्हिडीओत वरुण एका गोंडस बाळासोबत खेळताना दिसतोय. वरुण या बाळाच्या इतक्या प्रेमात पडलाय. बाळाशी खेळत असताना “ओह हा किती गोड आहे” असं वरुणने बाळाला म्हंटलय. “अरुणाचल प्रदेशमधील बाळ थायगी कांबो याचं नावं आहे.” असं कॅप्शन वरुणने या पोस्टला दिलंय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by VarunDhawan (@varundvn)

  वरुणचा हा व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. काही तासातचं या पोस्टला ९ लाखांहून अधिक लाईक मिळाले आहेत.