varun dhavan

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. या चित्रपटात तो वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. . वरुणसोबत या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण वरूणने शेअर केलेल्या त्या व्हिडिओमुळे एक वेगळीच चर्चा सोशल मीडियावर रंगली.

अभिनेता वरूण धवनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे तो चर्चेत आला आहे. गेले काही दिवस त्याचा आगामी चित्रपट कुली नंबर १ मुळे तो चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. या चित्रपटात तो वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. . वरुणसोबत या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण वरूणने शेअर केलेल्या त्या व्हिडिओमुळे एक वेगळीच चर्चा सोशल मीडियावर रंगली.

‘तुमच्या वहीनीशी ओळख करुन देतो’ असं म्हणत वरूणने एक व्हिडिओ शेअर केला आहे. चाहत्यांशी संवाद साधातात. आपण आयुष्यात खूप गोष्टी लपवल्या आहेत. आता मी आणखी लपवू शकत नाही. अनेक अफवा पसरवल्या जातात आणि त्यावर तुम्ही काही बोलू शकत नाही. म्हणून मी निर्णय घेतला आहे की उद्या तुमची होणाऱ्या वहिनीशी ओळख करुन देतो’ असं वरुणने व्हिडीओमध्ये म्हटलय. त्यामुळे वरूण नेहमी कोणाची ओळख करून देणार याची उस्तुकता चाहत्यांमध्ये होती.

 लग्नाची घोषणा नाहीतर हे कुली नंबर १ च गाणं

गेल्या काही दिवसांपासून वरुण गर्लफ्रेंड नताशा दलालमुळे चर्चेत आहे. तो लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण वरूणने होणाऱ्या पत्नीशी नाही तर कुली नंबर १ मधल्या गाण्याची ओळख करून दिलीये.

 

 

‘कुली नंबर १’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये सारा आणि वरुणसोबत परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लीवर, राजपाल यादव हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती वासू भगनानीने केली आहे. हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘कुली नंबर १’ हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झालेल्या कुली नंबर १ चा रिमेक आहे.या चित्रपटात अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.