वरुण-कियारा ‘जुग जुग जिओ’, रिहर्सलसाठी सर्व कलाकार मंडळी एकत्र

मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये 'जुग जुग जिओ'च्या चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या चित्रपटाचं दुसरं शूटिंग शेड्यूल कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लावण्यात आलेल्या लॅाकडाऊननंतर ऑगस्टमध्ये पूर्ण करण्यात आलं. सध्या सुरू असलेल्या शेड्यूलमध्ये गाण्यांच्या शूटिंगवर भर देण्यात येणार आहे.

    ‘जुग जुग जिओ’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या फायनल शूट शेड्यूलचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. यावेळी वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर, नीतू कपूर यांच्यासोबत दिग्दर्शक राज मेहतांनी एक फोटो क्लीक केला. कोरिओग्राफर बॅास्को मार्टिसनं कोरिओग्राफ केलेल्या या चित्रपटातील गाण्याच्या रिहर्सलसाठी सर्व कलाकार मंडळी एकत्र जमली होती.

    मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये ‘जुग जुग जिओ’च्या चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या चित्रपटाचं दुसरं शूटिंग शेड्यूल कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लावण्यात आलेल्या लॅाकडाऊननंतर ऑगस्टमध्ये पूर्ण करण्यात आलं. सध्या सुरू असलेल्या शेड्यूलमध्ये गाण्यांच्या शूटिंगवर भर देण्यात येणार आहे.

    या चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांनी यापूर्वी ‘गुड न्यूज’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘जुग जुग जिओ’ हा चित्रपट लाइट हार्टेड ड्रामा असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटात मनिष पॅालचीही भूमिका असून, यु ट्यूब स्टार प्राजक्ता कोळी या चित्रपटाद्वारे बॅालिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.