‘व्हेनिस फिल्म फेस्टीवल २०२०’ ठरल्याप्रमाणेच होणार

व्हेनिस फिल्म फेस्टीवल २०२० निर्धारित वेळापत्रकाप्रमाणेच पार पाडला जाणार आहे. लुका जाईया यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ते १२ सप्टेंबर या कालावधीत या फेस्टीवलचे आयोजन करण्यात येणार आहेे. 

बिनाले ऑफ आर्कीटेक्चर २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आला आहे. या बिनालेच्या स्थगितीच्या बातमीनंतर व्हेनिस फिल्म फेस्टीवलदेखील पुढे ढकलला जाईल किंवा रद्द होईल अशी चर्चा सुरु होती. मात्र आता फेस्टीवल ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.