दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन, मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

हिंदी चित्रपटसृस्ष्टीतील ट्रॅजिडी किंग दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर उपचारादरम्यान, त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.

    मुंबई : हिंदी चित्रपटसृस्ष्टीतील ट्रॅजिडी किंग दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर उपचारादरम्यान, त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.

    काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना रुग्नायालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यापासूनचं त्यांचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. पण, आज पहाटे उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला.

    ट्रॅजडी किंग दिलीप कुमार

    ‘ट्रॅजडी किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमारांनी सुमारे सहा दशकं त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं आहे. या काळात त्यांनी 63 चित्रपटात काम केलं. आपल्या कामामुळे अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी नवे आयाम प्रस्थापित केले. सध्या पाकिस्तानात असलेल्या पेशावरमध्ये 11 डिसेंबर 1922 साली त्यांचा जन्म झाला. त्याचं मूळ नाव युसूफ खान होतं. त्यांचे वडील फळ व्यापारी होते.

    ‘ज्वार भाटा’ हा त्यांचा पहिला चित्रपट 1944 मध्ये प्रदर्शित झाला होता. 1998 मध्ये आलेल्या किला चित्रपटातली भूमिका त्यांची अखेरची भूमिका ठरली. मुघल-ए-आजम, नया दौर, देवदास, या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. भारतातच नाही तर पाकिस्तानातही त्यांचे असंख्य चाहते आहेत.