रणधीर कपूर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, कोकिलाबेन रूग्णालयात केलं दाखल!

रणधीर कपूर यांची कोरोना चाचणीची पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत होती.

    अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ७४ वर्षीय रणधीर कपूर यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. याबाबत कपूर कुटुंबीयांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

    रणधीर कपूर यांची कोरोना चाचणीची पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत होती. पण रणधीर यांना मधूमेह आणि काही आजार असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

     ‘रणधीर कपूर यांना कोरोना झाल्यामुळे २८ एप्रिल रोजी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे’ असे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णलयाचे सीईओ डॉक्टर संतोष शेट्टी यांनी सांगितले. यापूर्वी रणबीर कपूरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याने स्वत:ला घरीच क्वारंटाइन करुन घेतले होते.