dilip kumar

दिलीप कुमार यांच्या मृत्यूने सायरा बानो पूर्णपणे खचल्या होत्या. अभिनेत्याच्या अंत्यदर्शनाची काही छायाचित्रे समोर आली होती, जी खूप भावनिक होती.

    दिवंगत अभिनेते दिलीप कुमार  यांच्या पत्नी अभिनेत्री यांची तब्येत अचानक खालावली आहे. सायरा बानो यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीच्या अहवालानुसार त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना नेमकं काय झालं हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांचे पती अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले होते. दिलीप साहेबांच्या जाण्याने सायरा बानो एकाकी झाल्या होत्या. व त्यांना धक्का बसला होता, अद्याप त्या धक्कातून सावरल्या नसल्याचे बोलले जात आहे. अशातच आता त्यांची तब्येत बिघडल्याने चाहते देखील काळजीत पडले आहेत.

    दिलीप कुमार यांच्या मृत्यूने सायरा बानो पूर्णपणे खचल्या होत्या. अभिनेत्याच्या अंत्यदर्शनाची काही छायाचित्रे समोर आली होती, जी खूप भावनिक होती. या फोटोंमध्ये अभिनेत्री सायरा पती दिलीप कुमार यांच्या पार्थिवाला शेवटच बिलगून धायमोकलून रडताना दिसल्या होत्या. मात्र, आता त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत.

    वयाच्या १७ व्या वर्षी सायरा बानो यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी १९६१ मध्ये शम्मी कपूरसोबत ‘जंगली’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी या चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू अशा प्रकारे पसरवली की, त्यांची प्रतिमा रोमँटिक नायिकेची बनली. या चित्रपटासाठी सायराला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते.