ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

  • ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (Actress ashalata wabgaonkar) यांचं आज पहाटेच्या सुमारास निधन
  • काही दिवसांपूर्वी आशालता यांना कोरोनाचा (Corona) लागण  झाली होती.
  • अभिनेत्री आशालता वाबगावकर या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या.
  • आशालता यांच्या जाण्याने संंपूर्ण मराठी कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (Actress ashalata wabgaonkar) यांचं आज पहाटेच्या सुमारास निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी आशालता यांना कोरोनाचा (Corona) लागण  झाली होती. त्यामुळे त्यांना साताऱ्यातील (Satara) प्रतिभा हॉस्पिटलमध्ये (Pratibha hospital)  उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, काल सोमवारी आशालता यांची प्रकृती खालावल्याने त्या व्हेंटिलेटरवर होत्या. मात्र, कोविड निमोनियामुळे आज मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांनी प्रतिभा हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

गेले ५ दिवस त्या साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमधील कोविड अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर होत्या, परंतु अतिगंभीर संसर्गामुळे त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. संजय साठे आणि हृदय विकार तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी दिली.

अभिनेत्री आशालता वाबगावकर या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. अनेक चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर त्यांनी मालिकांकडे आपलं पाऊलं टाकलं होतं. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत त्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होत्या. आशालता यांच्या शेवटच्या क्षणी अभिनेत्री अलका कुबलसोबत होत्या असं सांगण्यात येत आहे. तसेच काळूबाईच्या सेटवर मुंबईहून एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी २२ कलाकार आले होते. परंतु आशालता यांच्या जाण्याने संंपूर्ण मराठी कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.