ज्येष्ठ नाटककार इब्राहिम अलकाझी यांचे निधन

ज्येष्ठ नाटककार इब्राहिम अलकाझी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय रंगभूमीची व्याख्या बदलणारे नाटककार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

ज्येष्ठ नाटककार इब्राहिम अलकाझी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय रंगभूमीची व्याख्या बदलणारे नाटककार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते काही काळ नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या संचालकपदी देखील होते. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर त्यांनी आर्ट हेरिटेज दिल्ली मध्ये सुरू केले होते. या हेरिटेज मध्ये त्यांनी त्यांच्या कलाकृती, फोटो आणि पुस्तकं ठेवली होती. 

त्यांनी अनेक कलाकारांना देखील घडवले आहे. अलकाझी जेव्हा मुंबईत होते तेव्हा त्यांनी भारतीय रंगभूमीची ओळख ही शेक्सपिअर आणि ग्रीक नाट्यकृतींशी घडवली. या कलाकृती भारतीय रंगमंचावर आणल्या. त्यामुळे भारतीय रंगभूमीचा कायापालट होण्यास मदत झाली .ग्रीकच्या शोकांतिका, शेक्सपिअर, हेन्रिक इसबे, ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग या नाटककारांची नाटकं त्यांनी भारतीय रंगभूमीवर आणली.