विभुतीचे करोडपती बनण्‍याचे स्‍वप्‍न तिवारीसाठी ठरले दु:स्‍वप्‍न!

ॲन्ड टीव्‍हीवरील मालिका 'भाबीजी घर पर है'मधील मॉडर्न कॉलनीमध्‍ये राहणारे मनमोहन तिवारी (रोहताश्‍व गौड) आणि विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख) यांच्‍यामध्‍ये लहान-लहान गोष्‍टींवरून सतत नोक-झोक पाहायला मिळत आहे.

मुंबई : ॲन्ड टीव्‍हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील मॉडर्न कॉलनीमध्‍ये राहणारे मनमोहन तिवारी (रोहताश्‍व गौड) आणि विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख) यांच्‍यामध्‍ये लहान-लहान गोष्‍टींवरून सतत नोक-झोक पाहायला मिळत आहे. त्‍यांना स्‍वत:च्‍या पत्‍नीबाबत नाही तर एकमेकांच्‍या पत्‍नीबाबत आकर्षण आहे. धक्‍कादायक घटनांमध्‍ये विभुतीला तिवारीचे दुकान ‘कच्‍छे बनियान का खोखा’मध्‍ये नोकरी करावी लागणार आहे.

सुरूवातीला तिवारी या गोष्‍टीला नकार देणार आहे, पण लवकरच त्‍याला अनिता भाभीसाठी (सौम्या टंडन) असलेल्‍या प्रेमाची पुन्‍हा जाणीव होणार आहे. तो विभुतीबाबत निर्दयीपणे चिडचिड करणार आहे. ज्‍यामुळे शेवटी विभुती नोकरी सोडून करोडपती बनण्‍याची मोठी योजना आखणार आहे. त्‍याची योजना काय आहे आणि तो तिवारीचा पाणउतारा कशाप्रकारे करणार?

करोडपती बनण्‍याच्‍या या भव्‍य योजनेबाबत बोलताना विभुतीची भूमिका साकारणारा आसिफ शेख म्‍हणाला, ”प्रेक्षकांना हा एपिसोड आवडणार आहे. प्रत्‍येकाने कधी-ना-कधी तुच्‍छपणे वागणूक देणा-या त्रासदायक बॉसच्‍या हाताखाली काम केलेले आहे. असेच काहीतरी विभुतीच्‍या बाबतीत घडले, जेव्‍हा त्‍याने तिवारीजीसोबत त्‍याचे दुकान ‘कच्‍छे बनियान का खोखा’मध्‍ये काम करण्‍याचा प्रयत्‍न केला.

विभुती तिवारीचा पाणउतारा करण्‍यासाठी योजना आखतो. असे करत असताना विभुती करोडपती बनणार आहे, ज्‍यावर तिवारी अचंबित होणार आहे. तिवारी उत्‍सुक व लोभी बनतो आणि त्‍याची आता विभुतीसोबत काम करण्‍याची इच्‍छा आहे. हाच या कथेचा मुख्‍य मुद्दा आहे, जो प्रेक्षकांना अचंबित करेल.”

आगामी एपिसोडमध्‍ये विभुती व तिवारी यांच्‍यामधील या हास्‍यजनक व मजेशीर गमतीजमती पाहा ‘भाबीजी घर पर है’मध्ये दर सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० वाजता फक्‍त ॲन्ड टीव्‍हीवर!