vicky in sardar udham

अमेझॉन प्राईम व्हिडीओचा (Amazon Prime Video)ओरिजिनल चित्रपट असलेल्या ‘सरदार उधम’मधील एक नवा लूक विकीनं (Vicky Kaushal Sardar Udham Look)नुकताच सोशल मीडियावर रिव्हील केला आहे.

  ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या बहुचर्चित चित्रपटानंतर विकी कौशल सध्या ‘सरदार उधम’(Sardar Udham) या आगामी हिंदी चित्रपटामुळं चर्चेत आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओचा (Amazon Prime Video)ओरिजिनल चित्रपट असलेल्या ‘सरदार उधम’मधील एक नवा लूक विकीनं (Vicky Kaushal Sardar Udham Look)नुकताच सोशल मीडियावर रिव्हील केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)


  या लूकमध्ये विकीला ओळखणं कठीण आहे. सरदार उधम यांची बरीच टोपणनावं होती आणि त्यांनी आपल्या मिशनसाठी वेगवेगळी रूपं धारण केली होती ? त्यांचा हा लूक १९३१मधील आहे, जेव्हा उधम सिंह प्रतिबंधित कागदपत्र ‘गदर-ए-गंज’ (विद्रोहाचा आवाज) हाताळण्याचा आरोपाखाली जेलमध्ये होते. सोडण्यात आल्यानंतरही ते नजरकैदेत होते. तिथून लवकरच त्यांनी युरोपात पलायन केलं आणि मग ते कधीच परत भारतात आले नाहीत. या सर्व उत्कंठावर्धक गोष्टींमुळं विकीनं रिव्हील केलेला लूक महत्त्वाचा ठरला असून, चित्रपटाबाबत उत्सुकता वाढवणारा आहे.

  ‘सरदार उधम’ हा चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.