उरी द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटातून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे विक्की कौशल. विक्कीने अभिनयाने सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. विकी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. नुकताच विकीने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत विकीने त्याच्या शेजाऱ्यांची ओळख करून दिली आहे. विकीचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram
विकीने त्याचा हा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. विकीसोबत या फोटोमध्ये एक पाळीव कूत्री दिसत आहे. या कूत्रीच नाव बेला आहे. बेला ही विकीच्या शेजाऱ्यांची पाळीव कूत्री आहे. विकीने हा फोटो शेअर करत “शेजारी… #बेला” असे कॅप्शन दिले आहे. विकी आणि बेलामधील प्रेम पाहून त्याचे चाहते आनंदी झाले आहेत.
View this post on Instagram
सोशल मीडियाच्या माध्यमातून विकी त्याच्या चाहत्यांशी संवाद देखील साधत असतो. तो कधी त्याच्या बालपणीचे फोटो शेअर करतो तर कधी त्याच्या डॅशिंग लूकचा फोटो शेअर करताना दिसतो. त्याच्या प्रत्येक फोटोवर चाहते आवर्जून कमेंट करताना दिसतात.
View this post on Instagram
दरम्यान, शूजित सरकार दिग्दर्शित ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटात विकी मुख्य भुमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात विश्व सुंदरी मनुषी छिल्लर देखील विकीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लवकरच हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.