या चित्रपटासाठी सारा आणि विकी कौशल आले एकत्र, जोरात तयारी सुरू!

. या चित्रपटाचं शूटिंग युरोपीयन देशांमध्ये करण्यात येणार आहे. पाच महिन्यांच्या लांबलचक शूटिंग शेड्यूलमध्ये हा चित्रपट पूर्ण करण्याचा प्रोडक्शन हाऊसचा मानस आहे.

  आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या ‘अश्वत्थामा’ या आगामी हिंदी चित्रपटाबाबत महत्वाची माहिती मिळाली आहे. रॅानी स्क्रूवाला यांची निर्मिती असलेला हा चित्रपट सप्टेंबरनंतर फ्लोअरवर जाणार आहे. महाभारतातील अश्वत्थामावर आधारित असलेल्या या चित्रपटात विकी कौशल आणि सारा अली खान हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटानंतर आदित्य आणि विकी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

  सध्या या चित्रपटाची जोरदार तयारी सुरू असल्याचं समजतं. मागील काही महिन्यांपासून विकी आणि सारा आपापल्या रोल्सची तयारी करत आहेत. यासाठी दोघेही अॅक्शनची नवी शैली आत्मसात करत असल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटाचं शूटिंग युरोपीयन देशांमध्ये करण्यात येणार आहे. पाच महिन्यांच्या लांबलचक शूटिंग शेड्यूलमध्ये हा चित्रपट पूर्ण करण्याचा प्रोडक्शन हाऊसचा मानस आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

  पुढल्या वर्षी जानेवारीमध्ये शूट पूर्ण करून पोस्ट-प्रोडक्शनवर लक्ष केंद्रित करण्याची योजना आहे. २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.