बॉलिवूड पदार्पणातच ३ चित्रपट साईन केल्यानंतर विकीच्या भावाचे नखरे वाढले…वाचा काय केलं त्याने!

फिल्ममेकर आनंद एल. राय सध्या कलर यलो प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली बऱ्याच चित्रपटांची निर्मिती करण्यात बिझी आहेत. राय यांनी नुकतीच तीन नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली आहे.

    जगभर गाजलेल्या कलात्मक चित्रपटांद्वारे सिनेसृष्टीत दाखल झाल्यानंतर सध्या शंभर टक्के व्यावसायिक चित्रपटांमध्ये व्यग्र असलेल्या विकी कौशलनं अल्पावधीत आपला वेगळा चाहता वर्ग तयार करण्यात यश मिळवलं आहे. थोरल्या भावाच्या पावलावर पाऊल टाकत ‘भंगरा पा ले’द्वारे विकीचा भाऊ सनी कौशलनंही अभिनयात प्रवेश केला आहे. आता सनीला आणखी एक चित्रपट मिळाला आहे.

    फिल्ममेकर आनंद एल. राय सध्या कलर यलो प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली बऱ्याच चित्रपटांची निर्मिती करण्यात बिझी आहेत. राय यांनी नुकतीच तीन नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार यातील एका चित्रपटासाठी राय यांनी सनीला साईन केलं आहे. या चित्रपटाचं टायटल ‘नखरेवाली’ असं आहे. पुन्हा एकदा राय एका वेगळ्या स्टोरीलाईनसह चित्रपट बनवणार आहेत. हा सोशल कॉमेडी चित्रपट असून, यात मुलींप्रमाणे ड्रेसेस आवडणाऱ्या तरुणाच्या भूमिकेत सनी दिसणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

    या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी राय आपल्या एखाद्या असिस्टंटच्या खांद्यावर सोपवणार असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाखेरीज सनीकडं आणखी दोन चित्रपट आहेत. यापैकी ‘सिद्धांत’मध्ये त्याच्यासोबत राधिका मदान आहे, तर ‘हुरदंग’मध्ये नुसरत भरुचा. ‘नखरेवाली’मध्ये तो कोणासोबत नखरे करतो ते पहायचं आहे.