चक्क पीपीई सूट घालून अभिनेत्रीने केली भाजी-पाला खरेदी, VIDEO होतोय सोशल मीडियावर व्हायरल!

 या व्हिडिओसोबत राखीने लिहिले आहे, "कृपया सुरक्षित रहा, पीपीटी किट घाला आणि जेथे जायचे असेल तेथे जा." अभिनेत्रीने नुकतीच आपली आगामी वेब सिरीज 'तवायफ बाजार-ए-हुस्न'चे काम सुरू केले आहे, मारुख मिर्झा या सिरिझचे दिग्दर्शक आहेत.

  सोशल मीडियावर सध्या अभिनेत्रीचा पीपीईटी घालून भाजी खरेदी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ‘बिग बॉस १४’ फेम राखी सावंतने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती पीपीई सूट घालून भाजीपाला खरेदी करताना दिसत आहे. राखीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यात, पीपीई सूटसोबतच हँडग्लोज आणि मास्कदेखील घातल्याचे दिसते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

  या व्हिडिओसोबत राखीने लिहिले आहे, “कृपया सुरक्षित रहा, पीपीटी किट घाला आणि जेथे जायचे असेल तेथे जा.” अभिनेत्रीने नुकतीच आपली आगामी वेब सिरीज ‘तवायफ बाजार-ए-हुस्न’चे काम सुरू केले आहे, मारुख मिर्झा या सिरिझचे दिग्दर्शक आहेत.

  राखी सावंतने पती रितेशसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. राखी सावंतने आपल्या कॅन्सरशी संघर्ष करत असेल्या आईची शपथ खात खरोखरच तिचा पती रितेश असल्याचे म्हटले होते. तसेच आमचे लग्न नेमके कोणत्या मार्गावर जात आहे, हे आपल्याला माहित नाही, असेही ती म्हणाली होती.