mayuri deshmukh

या व्हीडिओमध्ये तिने तिच्या खास मैत्रीणीला शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हीडिओमध्ये मयुरी पती आशुतोषविषयी बोलताना दिसत आहे. तिच्या या खास मैत्रीणीने तिला आशुतोषला नैराश्यामधून बाहेर काढण्यासाठी मदत केल्याचे तिने म्हटले आहे. ‘माझ्याकडून आणि आशुकडून श्वेता तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आशुला भावना व्यक्त करायला जमायचे नाही.

‘खुलता खळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुख (Actress Mayuri Deshmukh) हिचा पती अभिनेता आशुतोष भाकरे ( Ashutosh)  याने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. नांदेडमधील राहत्या घरात आत्महत्या केल्याचे समोर आले. नैराश्येच्या समस्येचा सामना करत असल्याने त्यामधूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती नंतर समोर आली होती. आशुतोषच्या अचानक जाण्याने मयुरीला धक्का बसला होता. तिने आशुतोषच्या वाढदिवशी पोस्ट शेअर केली होती. पण आता मयुरीने एक व्हीडिओ शेअर केला आहे. नुकताच मयुरीने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हीडिओ शेअर केला आहे.

या व्हीडिओमध्ये तिने तिच्या खास मैत्रीणीला शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हीडिओमध्ये मयुरी पती आशुतोषविषयी बोलताना दिसत आहे. तिच्या या खास मैत्रीणीने तिला आशुतोषला नैराश्यामधून बाहेर काढण्यासाठी मदत केल्याचे तिने म्हटले आहे. ‘माझ्याकडून आणि आशुकडून श्वेता तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आशुला भावना व्यक्त करायला जमायचे नाही.

View this post on Instagram

A post shared by Mayuri 🙂 (@mayurideshmukhofficialll) on

त्यामुळे त्याने तुला कधीच सांगितले नसेल की तू त्याच्या आयुष्यात असल्यामुळे तो किती आनंदी होता. खास करून गेल्या एक वर्षापासून. तू माझी खास मैत्रीण असूनही त्याला किती समजून घेतले तेही अगदी सहजपणे आणि आमचा जो काही प्रवास होता नैराश्याला समजून घेण्याचा, त्याला कसे समोरे जाता येईल, हा सगळा आमचा प्रवास, हा आमचा संघर्ष तितकाच तुझाही होता’ असे मयुरीने म्हटले आहे. मयुरीने या व्हीडिओमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.