विधु विनोद चोप्रा यांच्या मोठ्या भावाचं कोरोनामुळे निधन, ५ जुलैला घेतला अखेरचा श्वास!

वीर हे मालदिवला सुट्ट्यांमध्ये गेले दरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर त्यांना मुंबईमधील एच. एन. रिलायन्स या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

    चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांचा मोठा भाऊ वीर चोप्रा यांच कोरोनामुळे निधन झालं आहे. वीर चोप्रा यांचे ५ जुलै रोजी निधन झाले आहे. वीर यांनी ‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘ब्रोकन हॉर्सेज’, ‘लगे रहो मुन्ना भाई’ आणि ‘3 इडियट्स’ या चित्रपटांसाठी विधु यांच्यासोबत काम केले होते.

    वीर हे मालदिवला सुट्ट्यांमध्ये गेले दरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर त्यांना मुंबईमधील एच. एन. रिलायन्स या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या २१ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.

    वीर चोप्रा यांच्या पत्नी साउंड डिझायनर आहेत. वीर चोप्रा यांच्या मुलाचे नाव अभय चोप्रा उर्फ विकी चोप्रा आहे. वीर यांनी ‘फरारी की सवारी’, ‘एकलव्य: द रॉयल गार्ड’, ‘परिणीता’, ‘मिशन कश्मीर’ आणि ‘करीब’ या चित्रपटांची निर्माती केली आहे.