विद्या बालनच्या ‘शेरनी’ चा ट्रेलर आला, या तारखेला चित्रपट होणार प्रदर्शित!

ट्रेलर लॉन्चप्रसंगी स्वत:चा उत्साह व्यक्त करताना अभिनेत्री विद्या बालन म्हणाली की, ‘मी पहिल्यांदा शेरनी’चे कथानक ऐकलं आणि ते मला भावलं.

  विद्या बालनचा शेरनी जगातील २४० हून अधिक देशांमध्ये १८ जूनला प्रदर्शित होणार आहे.  असून त्याच्या ट्रेलरचं प्रकाशन आज करण्यात आलं आहे. या चित्रपटात विद्या बालन प्रमुख भूमिकेत आहे. ती एका वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन न्यूटन’फेम, पारितोषिक विजेता फिल्ममेकर अमित मसुरकर यांनी केलं आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

  सिनेमाचा ट्रेलर रोमांचक

  विद्या ज्या विभागात कार्यरत असते, तिथली उदासीनताच तिला जोशाने स्वत:ची धमक सिद्ध करण्याची ऊर्जा देते. चित्रपटाचा ट्रेलर रोमांचक आहे. चित्रपटात विद्याचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे. हे जग चमत्कारी, आपल्या अनुभवाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तिरेखांनी भरलेले आहे. आपली चाकोरी बाहेरची नोकरी सांभाळून विद्या विवाहित आयुष्य जगत असते. हे करत असताना काही लोकांच्या वृत्तीचा सामना तिला करावा लागतो.

  अभिनेत्री विद्या बालननं व्यक्त केल्या भावना

  ट्रेलर लॉन्चप्रसंगी स्वत:चा उत्साह व्यक्त करताना अभिनेत्री विद्या बालन म्हणाली की, ‘मी पहिल्यांदा शेरनी’चे कथानक ऐकलं आणि ते मला भावलं. मी व्यक्तिरेखेत शिरले. मी साकारत असलेली चित्रपटातील विद्या काही शब्दांत समजावून घेता येईल. मात्र व्यक्तिरेखेचे अनेक पैलू आहेत. या चित्रपटाचा विषय अतिशय संवेदनशील आहे. ही अभिनव व्यक्तिरेखा साकारताना मला फारच आनंद झाला.

  या चित्रपटात शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राझ, इला अरूण, ब्रिजेंद्र काला आणि नीरज काबी यांच्या मुख्य भूमिका असतील.