Refusing the minister for dinner cost actress Vidya Balan dearly; Shooting of 'Lioness' movie stopped

विद्यानं तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक अनोखी स्टाईल कॅरी केली. ती प्रत्येक कार्यक्रमात सिंह किंवा अ‍ॅनिमल प्रिंटशी संबंधित आउटफिटमध्ये दिसली.

  विद्यानं नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळ्या सिनेमांची निवड केल्यानं ‘शेरनी’ या आगामी चित्रपटाकडूनही अपेक्षा वाढल्या आहेत. ‘द डर्टी पिक्चर’ मधील सिल्क स्मिथा असो, वा ‘कहानी’मधील विद्या बाघची… ‘शकुंतला देवी’मधील गणितज्ज्ञ असो, वा ‘तुम्हारी सुलू’मधील आरजे… विद्यानं नेहमीच आश्चर्यचकीत करणाऱ्या भूमिका लीलया साकारल्या आहेत. याच कारणामुळं निर्माते भूषण कुमार आणि विक्रम मल्होत्रा यांच्यासोबत दिग्दर्शक अमित मसूरकर यांनी ‘शेरनी’साठी विद्याची निवड केली. मानव-प्राण्यांच्या संघर्षावर आधारीत या चित्रपटात विद्या वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Vidya Balan (@balanvidya)

  या चित्रपटाचा अंतिम कट पाहून निर्माते क्लीन बोल्ड झाले असून, विद्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. विक्रम यांच्या म्हणण्यानुसार, विद्या अपवादात्मक अभिनेत्री असून, तिनं मागील १६ वर्षांत जी कामं केली आहेत त्याच्यावर डाय हार्ड फॅन फांचाईस तयार झालं आहे. ‘शकुंतला देवी’साठी काम करताना तिनं स्वत:ला त्या गुंतागुंतीच्या भूमिकेशी कसं एकरूप केलं ते मी पाहिलं होतं. त्यामुळंच ‘शेरनी’साठी विद्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता, असं विक्रम यांचं म्हणणं आहे. भूषण कुमार म्हणाले की, ‘तुम्हारी सुलू’मध्ये विद्याबरोबर काम करताना खूप मजा आली. विद्या एक समर्पित अभिनेत्री असून, कलेवर असणार तिचं नितांत प्रेम स्क्रीनवर झळकतं. विद्याबरोबर काम करणं म्हणजे नेहमीच मजेदार अनुभव आणि शिकण्याची संधी असते.

  विद्यानं तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक अनोखी स्टाईल कॅरी केली. ती प्रत्येक कार्यक्रमात सिंह किंवा अ‍ॅनिमल प्रिंटशी संबंधित आउटफिटमध्ये दिसली. नुकतंच ती सिंहाच्या चेहर्‍याची प्रिंट असेली साडी परिधान करुन दिसली. चाहत्यांना तिची ही स्टाईल प्रचंड आवडली आहे. फोटो शेअर करताना विद्यानं ‘मूड ऑल डे’ असं कॅप्शन दिलं.