विद्या बालनचा रिया चक्रवर्तीला पाठिंबा, म्हणाली…

लक्ष्मी मंचूने रियाला पाठिंबा दर्शवणारी एक पोस्ट केली आहे. यामध्ये तिने राजदीप सरदेसाई यांनी रियाच्या मुलाखतीचा उल्लेख केला आहे. त्यानंतर तिला प्रतिक्रिया देत अभिनेत्री विद्या बालननेही या प्रकरणात आपलं मत व्यक्त केलं आहे. यामध्ये विद्याने संविधानाचा आदर करण्याचं आवाहन केलं आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput suicide) रिया चक्रवर्तीवर (Riya Chakraborty) अनेक आरोप केले जात आहेत. तसेच ईडीकडून देखील तिची कसून चौकशी केली जात आहे. मात्र या प्रकरणी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी रिया चक्रवर्तीला पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये आता अभिनेत्री विद्या बालननेही आपल्या ट्विटर आकाउंटवरुन ट्विट करत रियाला पाठिंबा दर्शवला आहे.

लक्ष्मी मंचूने रियाला पाठिंबा दर्शवणारी एक पोस्ट केली आहे. यामध्ये तिने राजदीप सरदेसाई यांनी रियाच्या मुलाखतीचा उल्लेख केला आहे. त्यानंतर तिला प्रतिक्रिया देत अभिनेत्री विद्या बालननेही या प्रकरणात आपलं मत व्यक्त केलं आहे. यामध्ये विद्याने संविधानाचा आदर करण्याचं आवाहन केलं आहे. अद्याप रियावरील आरोप सिद्ध झाला नसून तोपर्यंत तिला दोषी ठरवू नये अशी भावना व्यक्त केली आहे, असं विद्याने म्हटलं आहे.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने देखील अभिनेत्री लक्ष्मी मानचूच्या ट्विटला रिट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने लोकांना कायद्यावर विश्वास ठेवण्यास सांगितले आहे. एखादा व्यक्ती कायद्याने दोषी सिद्ध झाला नसतानाही आपण त्याला दोषी ठरवणे चुकीचे आहे या आशयाचे ट्विट करत तापसीने संताप व्यक्त केला आहे.