विद्युत जामवाल पुन्हा एकदा एका नव्या रूपात या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

विद्युतनं स्वत:च सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. या चित्रपटात विद्युतच्या जोडीला शिवालीका ओबेरॅाय दिसणार आहे.

    नकारात्मक भूमिकांपासून सकारात्मक भूमिकाही यशस्वीपणे साकारत आज बॅालिवूडपासून टॅालिवूढपर्यंत आपल्या नावाचा एक वेगळा दबदबा बनण्यात यशस्वी झालेला विद्युत जामवाल पुन्हा एकदा एका नव्या रूपात समोर येणार आहे. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘खुदा हाफिज’ या चित्रपटात एक लव्हेबल हजबंड साकारल्यानंतर विद्युत आता ‘अग्निपरीक्षा’ देण्यासाठी सज्ज झाला आहे. विद्युतच्या आगामी चित्रपटाचं शीर्षक ‘अग्निपरीक्षा’ आहे.

    फायनली हा चित्रपट फ्लोअरवर गेला असून, विद्युतनं स्वत:च सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. या चित्रपटात विद्युतच्या जोडीला शिवालीका ओबेरॅाय दिसणार आहे. याखेरीज ‘खुदा हाफीज’नंतर पुन्हा एकदा विद्युतच्या जोडीला अन्नू कपूरही दिसणार आहेत. याशिवाय आहना कुमरा, शिव पंडीत, नवाब शाह आणि विपीन शर्मा यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

    विद्युतनं शेअर केलेल्या फोटोमध्ये शिवालीका, अभिषेक पाठक आणि दिग्दर्शक फारुक कबीर असून, कुमार मंगत पाठक यांनी क्लॅपबोर्ड पकडलेला पहायला मिळतं. या फोटोसोबत विद्युतनं ‘खुदा हाफीज’ चॅप्टर दोन ‘अग्निपरीक्षा’ हिट्स आॅन द फ्लोअर असं लिहिलं आहे. यावरून हा चित्रपट ‘खुदा हाफीज’चा सिक्वेल असल्याचं स्पष्ट होतं.